रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे कार धुण्याचे दुकान फोडून चोरट्यांनी अडीच हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याची ही घटना 8 फेबुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी गौरव संजय नलावडे (27, ऱा गयाळवाडी रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भारतीय न्याय संहिता 331(3),(4), 380 (अ) नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.