चिपळूण:तालुक्यातील टेरव-राधाकृष्णवाडी येथे घरात घुसून वृद्ध पती-पत्नीला चौघांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. यात पती-पत्नी जखमी झाले असून या प्रकरणी चौघांवर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची फिर्याद जयवंत रामचंद्र कदम (69, टेरव-राधाकृष्णवाडी) यांनी दिली. यामध्ये जयंवत कदम व त्यांची पत्नी जयश्री कदम जखमी झाले. शिवाजी रामचंद्र कदम (72), कदम (71), एक महिला (70), अन्य एक महिला (52-सर्व, टेरव-राधाकृष्णवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंवत कदम व त्यांची पत्नी असे दोघे घरात होते. त्यावेळी गुन्हा दाखल झालेले वरील चौघेजण हातात काठया व लोखंडी पाईप घेऊन जयंवत कदम यांच्या घराठिकाणी आले. त्यांनी घराच्या पाठीमागील सिमेंटचा दरवाजा टिकावाने तोडून घरात प्रवेश केला. यानंतर शिवाजी कदम यांनी काठी, पाईपाने जयंवत कदमना मारहाण केली. यावेळी जयश्री कदम या पुढे आल्या असता गुन्हा दाखल झालेल्या दोन महिलांनी त्यांना मारहाण केली. यात जयंवत कदमसह जयश्री कदम जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.