खेड:- तालुक्यातील बोरघर-कातकरकाडी येथील 59 वर्षीय प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. किसन हौशा पवार असे मृत प्रौढाचे नाव आहे. ते अंगणात बसलेले असताना अचानक फिट आल्याने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासले असता मृत घोषित केले. या बाबत येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.