रत्नागिरी : तालुक्यातील पाली मराठवाडा येथे गळफास घेत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. जितेंद्र सुनील सावंत (33, ऱा पाली मराठवाडा) असे मृताचे नाव आहे. जितेंद्र याने अज्ञात कारणातून घराच्या पडवीमध्ये छताला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतला, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे. जितेंद्र याने नेमके कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.