14 फेब्रुवारी रोजी नदी परिषदेचे आयोजन, मानवाकडून नद्यांचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी प्रयत्न
साडवली : सप्तलिंगी नदीच्या संवर्धनासाठी क्रांती व्यापारी संघटना, देवरूख, संगमेश्वर तालुका अॅग्रोस्टार शेतकरी उत्पादक कंपनी, देवरूख पंचायत समिती आणि नदीकाठावरील अठरा गावे यांच्या संयुक्त विद्यमाने १४ रोजी नदी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हा अनोखा उपक्रम नुकताच हाती घेण्यात आला आहे.
देवरूख प्रभागातून वाहणाऱ्या
नद्यांना आता गटाराचे स्वरूप आले आहे. त्याचे दुष्परिणामही सर्वचजणं सोसतात; पण त्या नद्यांचे ऐतिहासिक महत्व कुणी ओळखलेले नाही म्हणूनच त्या नद्यांचे विद्रुपीकरण करण्यास लोकं कचरत नाहीत. कचरा, सांडपाणी, गटारे, घाणेरड्या पाण्याचा निचरा राजरोसपणे नदीपात्रात केला जातो. परिणामी, दूषित जलस्त्रोत हे काही दिवसांनी मृत होतील. निसर्गाच्या नियमानुसार, जमिनीच्या पृष्ठभागावर वाहणारे पाणी
हे समस्त जीवसृष्टीच्या जीवितासाठी अनन्यसाधारण असा घटक आहे. मनुष्यप्राणी हा बुद्धीचा वापर करतो. ओरबाडून खाण्याची स्पर्धा सुरू असताना, निसर्गाचा तोल डळमळतो आहे हे कुणाच्याही ध्यानात कधी येत नाही; पण काही सुज्ञ लोक या नदीच्या संवर्धनासाठी झटत आहेत. त्यामुळे नदी संवर्धनासाठी १४ फेब्रुवारी रोजी देवरूख पंचायत समिती येथे छत्रपती संभाजी महाराज सभागृहात ही सप्तलिंगी नदी
परिषद आयोजित करण्यात आली आहे.
*नदी संवर्धनासाठी सहभाग घ्या*
नदीचा वहन प्रवाह ज्या ज्या गावातून जातो त्या अठरा गावांनी आपापल्या क्षेत्रात नदीचे सुशोभीकरण, नदी गाळमुक्त करणे या सारखे अनेक उपक्रम हाती घ्यावेत तसेच नदी संवर्धनासाठीच्या प्रयत्नांकरिता सर्वांनी या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन निखिल कोळवणकर, विजय शेलार यांनी केले आहे.