लांजा : शहरातील नारकर पटांगणावर पार पडलेल्या डिपार्टमेंटल प्रिमिअर लीग २०२५ चे विजेतेपद महापुरुष पोलीस संघाने पटकावले. तर महसूल व वन विभागाच्या संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.
शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रिकेटचा महासंग्राम अर्थात डिपार्टमेंटल प्रिमिअर लीग २०२५ भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा नुकतीच शहरातील नारकर पटांगण या ठिकाणी पार पडली. महसूल व वनविभाग, लांजा स्टार, आरोग्य विभाग, एसटी महामंडळ, नगरपंचायत, पंचायत समिती, पशुसंवर्धन, कृषी विभाग, महापुरुष पोलीस आणि जय हिंद क्रिकेट क्लब यांच्यावतीने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या डिपार्टमेंटल प्रिमिअर लीग २०२५ चे विजेतेपद महापुरुष पोलीस संघाने पटकावले, तर महसूल आणि वनविभागाच्या संघाला उपविजेतेपद मिळाले. दरम्यान, या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली.
लांजातील डिपार्टमेंटल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत महापुरुष पोलीस संघ विजेता, वनविभाग उपविजेता
