रत्नागिरी:-मुंबई – गोवा महामार्गावर बावनदी येथे आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ट्रकला मोठा अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर तर क्लिनर जखमी झाला आहे. या अपघातानंतर काहीकाळ वाहतूक ठप्प होती.
सविस्तर वृत्त असे की, ट्रक चालक आपल्या ताब्यातील ट्रक ( क्रमांक एम एच 09-BC 5941) घेऊन रत्नागिरी ते देवरूख चालला होता. ट्रकमध्ये सिमेंटच्या बॅग भरलेल्या होता. बावनदी येथे ट्रक आला असता त्याचा ट्रकवरील ताबा सुटला. आणि ट्रक गटारात पलटी झाला. यामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झाला. तर क्लिनर किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर येथील ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. नरेंद्र महाराज संस्थानच्या अँब्युलन्सने त्या दोघांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.