रत्नागिरी:-शहरालगतच्या भाटये खाडीकिनारी पुलाखाली आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शहर पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आह़े. 29 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास 50 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून होत़ा. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली होत़ी. अद्याप या मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलेले नाह़ी. कुणाला या इसमाबद्दल काही माहिती असल्यास शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आह़े