दापोली:-तालुक्यातील खेर्डी पांढरीची वाडी येथे मद्यप्राशन करणाऱ्यावर कारवाई केल्याची घटना 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.15 च्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेर्डी-पांढरीची येथे अरुण करबेले यांच्या घराच्या मागील बाजूस पंकज रघुनाथ अहिरे (45,मौजे दापोली) हा देशी दारू पित असताना आढळला. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 84 नुसार कारवाई करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.