चिपळूण:-रेल्वे प्रवासात 1 लाख रुपये किमतीचा लॅपटॉप चोरीस गेल्याची घटना चिपळूण रेल्वेस्थानकात काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणी सोमवारी अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची फिर्याद अलिना लालू (23, केरळ) यांनी दिली. अलिना लालू जामनगर तिरुनवेली एक्स्प्रेस या रेल्वेगाडीतून प्रवास करत होती. ती बसलेल्या आसनावर ठेवलेली लॅपटॉपची बॅग चोरटयाने चोरुन नेली. हा प्रकार अलिनाच्या लक्षात आल्यानंतर तिने दिलेल्या फिर्यादीनुसार चिपळूण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.