रत्नागिरी:-कोकण मार्गावरून धावणाऱ्या एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेसला मंगळवारी 4 तास 35 मिनिटांचा ‘लेटमार्क’ मिळाला. एक्स्प्रेस उशिराने धावल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. कोकण मार्गावर रोहा यार्डात पायाभूत सुविधांच्या कामांसाठी घेण्यात आलेल्या ‘ब्लॉक’मुळे चार रेल्वेगाडयाही विलंबाने धावल्या. कोईमतूर-जबलपूर 1 तास 40 मिनिटे तर दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस 1 तास उशिराने मार्गस्थ झाली. निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस 1 तास विलंबाने धावली. या गाडयांचा अपवाद वगळता उर्वरित सर्वच गाडया निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.