रत्नागिरी:-जिल्हा रूग्णालयात कॅन्सर रूग्ण तपासणी व केमोथेरपी उपचार मोफत होणार आहे. वाढते कर्करोग रुग्णांचे प्रमाण बघता, जास्तीत जास्त लोकांना कर्करोगावर त्वरीत तपासणी व उपचार करण्याकरिता जिल्हा शासकिय रुग्णालय येथील ओपीडी क्र. 02 येथे आठवडयातील दर बुधवारी लाईफ केअर हॉस्पिटल मधील विशेत्तज्ञ डॉ. शुभम बगाडे यांमार्फत कर्करोग रुग्ण तपासणी व उपचार केले. जातात. तसेच महिन्यातून एक शुक्रवार डॉ. विक्रम घाणेकर, ऑकोसर्जन यांच्यामार्फत रुग्ण तपासणी, केमोथेरपी उपचार मोफत करण्यात येतात. गेल्या काही वर्षात कर्करोगांच्या रुग्णाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात मुख, स्तनाचा आणि गर्भाशयाचा कर्करोग हे तीन प्रकारचे रुग्ण सर्वाधिक आहेत.जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण ४१ कर्करोगाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. कर्करोगावर कायमस्वरूपी उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे.
असंसर्गजन्य आजारांची झपाट्याने वाढ होत असून, जवळपास ६३ टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगामुळे होतात. त्यापैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ९ टक्के आहे. गेल्या काही वर्षात मुख कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाचा मुख कर्करोग हे तीन सर्वात जास्त आढळणारे कर्करोग आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत एकूण ४१ कर्करोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ओरल कॅन्सर १०, ब्रेस्ट कॅन्सर १४, गर्भाशयाचा कर्करोग १, अन्य प्रकारचे कर्करोग १६ अशी रुग्णसंख्या आहे. चार रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली असून, सर्व रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे मोफत किमोथेरपी उपचार करण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्यकेंद्र, उपकेंद्र आणि जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या मोहिमेची सुरवात करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३० वर्षावरील लोकांचे मौखिक (Oral), स्तन (Breast) व गर्भाशय मुख (Cervix) कर्करोग याकरिता सर्व आरोग्यसंस्थांमध्ये तपासणी शिबिर आयोजित केले आहे.