चिपळूण : 12 वी परीक्षेस मंगळवारपासून प्रारंभ झाला. चिपळूण तालुक्यात एकूण 7 केंद्रावर 3,165 इतके विद्यार्थी या परीक्षेस बसले असून त्यापैकी 44 विद्यार्थी पहिल्याच पेपरला गैरहजर होते. परीक्षा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मंगळवारी बारावी परीक्षेच्या पहिल्याच पेपरला विद्यार्थ्यांची लगबग दिसली. परीक्षावेळेपूर्वी काही तास अगोदर विद्यार्थ्यांसह काही पालक परीक्षा केंद्राबाहेर दाखल झाले होते. बैठक व्यवस्था पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यातच अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पहिल्या पेपरची चिंता दिसत होती. तालुक्यातील एकूण 7 केंदांवर कला, वाणिज्य, विज्ञान अशा 3 शाखाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु आहे. पहिल्या दिवशी डीबीजे महाविद्यालय केंद्रावर 726 पैकी 9, सती विद्यालयात 437 पैकी 15, सावर्डे विद्यालयात 788 हजरपैकी 9, गद्रे स्कूलमध्ये 468 पैकी 2, महाराष्ट्र हायस्कूलमध्ये 415 पैकी 5, शिरगाव विद्यालयात 220 हजर पैकी 1, तर रामपूर विद्यालय 155 पैकी 3 विद्यार्थी गैरहजर होते. विशेष म्हणजे यात 3 आवेदन पत्र रद्द झालेल्या विद्यार्थ्याचा समावेश आहे.