शाळेचे विद्यार्थी कु.मेघा तांबे,कु.आर्यन गोरीवले,कु.सार्थक रांबाडे ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी
चिपळूण/दिपक कारकर-प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलात्मक,अभ्यासात्मक गुणांना व्यासपीठ देणारा उपक्रम,नव-नवीन कल्पनांना आकार देण्यासाठी,विद्यार्थ्यांत नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करणे,बुद्धीवैभव आणि नव्या विचारांचे दर्शन घडविण्यासाठी आयोजित करण्यात येणारी स्पर्धा म्हणजे हॅकेथॉन होय.ह्या स्पर्धेतुन तंत्रज्ञान शोध घेणे,दैनंदिन कामाकाजात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे यावर काम करणारे न्यायाधीशांचे पॅनल असते त्यातून विजेत्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व रत्नागिरी येथे पार पडलेल्या हॅकेथॉन स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील जि.प.शाळा मुर्तवडे नं.२ ( कातळवाडी ) या शाळेने सहभाग घेतला होता.स्पर्धेत अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचा देखील सहभाग होता.यामधून कातळवाडी शाळेचे प्रतिनिधित्व करताना शाळेचे विद्यार्थी कु.आर्यन विनोद गोरीवले,कु.सार्थक संदीप रांबाडे व कु.मेघा चंद्रकांत तांबे आदींनी सहभाग घेत आपल्या कुशल बुद्धीने नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे.ह्या विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या हॅकेथॉन राज्यस्तर स्पर्धेत निवड करण्यात आली आहे.साऱ्यांच्या यशाबद्दल आकर्षक भेटवस्तु देऊन अभिनंदन करण्यात आले.सर्व विदयार्थी यांच्या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक अनंत शिगवण सर्,सहा.शिक्षिका कोहळे मॅडम, सुप्रिया धामापुरकर मॅडम,व सहा.शिक्षक मनोज खामकर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षक वृंद,समस्त कातळवाडी ग्रामीण-मुंबई सेवा मंडळ,व शाळा व्यवस्थापन कमिटीतर्फे अभिनंदनासह कौतुक होत आहे.