रत्नागिरी : पटवर्धन हायस्कूलचा शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंट्री व इंटरमिजिएटचा निकाल शंभर टक्के लागला. एलिमेंट्री परीक्षेची अ श्रेणीत २७ विद्यार्थी ब श्रेणीत २९ विद्यार्थी व क श्रेणीत ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इंटरमिजिएट परीक्षेमध्ये अ श्रेणीत २१ विद्यार्थी व ब श्रेणीत १२ विद्यार्थी व क मध्ये ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
एलिमेंट्रीसाठी एकूण ५७ विद्यार्थी तर इंटरमिजिएटचे ३३ विद्यार्थी अ, ब श्रेणीत उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना सौ. मुग्धा पाध्ये व रुपेश पंगेरकर यांनी मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थी शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. जानकी घाटविलकर, संस्था पदाधिकारी नंदकुमार साळवी, दादा वणजु, श्रीराम भावे, विनायक हातखंबकर आणि पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
अ श्रेणीतील विद्यार्थ्यांची नावे अशी- एलिमेंट्री- आदिती जामसंडेकर, अनन्या कळंबटे, ऐश्वर्या निर्मळे, अनिहा सुर्वे, अंजली फडके, अनुष्का चिप्रीकर, अर्णव टिकेकर, धनश्री चव्हाण, दिव्या जाधव, ईशा वायंगणकर, ऋषिकेश मोंडकर, मधुरा नाईक, मैथिली गावडे, मृण्मय आरेकर, मृण्मयी पांचाळ, रोशनी म्हात्रे, समृद्धी शिरगावकर, सानवी लिंगायत, श्रद्धा गोठणकर, श्रावणी शिंदे, स्वरा मुसळे, स्वरा वैद्य, तन्मय देसाई, वैदेही सावंतदेसाई, वरद खानविलकर, वेदिका बने, विदुला मुळ्ये.
इंटरमिजीएट- अंश सांडीम, अनुष्का वाघचवरे, अंतरा पिलणकर, अनुश्री कुंभवडेकर, अर्णव कशाळीकर, दिशिता खेडेकर, गौरव गोठणकर, किर्ती सावंतदेसाई, क्षितिज नांदेडकर, माही परिहार, माही सावंत, मिताली नांदगावकर, मुग्धा नेवरेकर, पवित्रा नागवेकर, प्रेक्षा पिलणकर, श्रेया राजबकर, स्मिता टापरे, सोहम आडिवरेकर, सृष्टी रेवाळे, तिर्था मयेकर, वैदेही ठाकरे.