शृंगारतळी (वार्ताहर) : कोकणातील बेदखल कुलांचे प्रश्न मार्गी लागायला हवेत असे मत बळीराज सेनेचे युवा नेते विनेश वालम यांनी दापोली मंडणगड येथील पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना केले. ते म्हणाले की, कोकणातील कुळ वहीवाटीचे प्रश्न मार्गी लागले तर सर्वसामान्य जनतेला शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. सरकार दरबारी याबाबत आपण लक्ष घालू, असे आश्वासन दिले.
कोकण दौऱ्यावर त्यावेळी दापोली व मंडणगड तालुक्याचे वतीने अध्यक्ष न्यानदेव खांबे, उप जिल्हा अध्यक्ष माळी गुरुजी, निकिता बाळगूदे सकपाळ, अंकिता शिगवण यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, संपर्क प्रमुख शरद बोबले, प्रशांत भेकरे, मनोहर गोमले, मनोहर पवार, अशोक घाणेकर, सचिन खाडे, अमित बोबले, अशोक जोशी यांचेसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थितीत होते