ग्रामीण डाक सेवक पद भरतीसाठी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर 3 मार्च पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन अधिक्षक डाकघर, रत्नागिरी यांनी केले आहे.
रत्नागिरी टपाल विभागातील ग्रामीण डाक सेवकांची एकूण 95 रिक्त पदे विविध प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत. या पद भरतीसाठीची प्रक्रिया 10 फेब्रुवारी पासून ऑनलाईन सुरु झाली असून उमेदवरांनी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून 3 मार्च पर्यंत अर्ज सादर करावेत.