रत्नागिरी:- शहरा पासून जवळच असलेल्या मजगांव ग्रामपंचायतीचे सरपंच फय्याज मुकादम आणि उप सरपंच शरीफ इब्जी यांच्या मार्गदर्शनाखाली आज ११ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचे स्मार्ट कार्ड काढून आधार लिंक करण्यात आले.
या कॅम्पचा लाभ मजगांव येथील बहूसंख्य शेतकऱ्यांनी घेतला. माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच सेवाभावी शेतकरी हुसैनमियाॅं पोमेटकर, इक्बाल पोमेटकर, अजीम मुकादम, ताजुद्दीन काजी, जहूर सोलकर, निसार सोलकर तसेच एजाज इब्जी आणि अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.
या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत उप सरपंच शरीफ इब्जी, ग्रामविकास अधिकारी अर्चना कळंबटे, डाटा आॅपरेटर रिनम कांबळे, सी. आर. पी. नुजहत नाकाडे,आशा ताई सेजल कदम, सरपंच यांची कन्या फाईजा मुकादम आणि प्रणय धुलप यांनी उत्तम कामगिरी केली.
ग्रामस्थांसाठी उत्तम आणि यशस्वी पणे उपक्रम घेतल्या बद्दल एजाज इब्जी यांनी आयोजकांचे आभार मानले.