दापोली : तालुक्यातील 17 वर्षीय मुलीचा तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. तरुणाने मुलीशी गैरवर्तन केले. याप्रकरणी अश्पाक लियाकत पावसकर (41, रा.दापोली) याच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 74,75,79,351 (2) तसेच बालकांचे लैगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 ( पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.