गुहागर : तालुक्यातील पालशेत, पाटावरचीवाडी येथील 18 वर्षीय सुमित सुनील घाणेकर याने रविवारी सायंकाळी 5 वाजता घरातील किचनच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. सदर हा तरुण शेतीची कामे करत असे. रविवारी सायंकाळी 5 वाजता आपल्या रूममध्ये किचनमधील छताच्या लोखंडी पाईपला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.