खेड : सोमवारीही सायंकाळी 3.45 वाजण्याच्या सुमारास भोस्तेसह अलसुरेत वणवा लागल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली. येथील नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने लगतच्या आंब्याच्या बागा व मोबाईल टॉवर यांना पोहोचणारा धोका टळला.
भोस्तेसह अलसुरेत वणवा लागल्याची खबर येथील नगरपरिषदेच्या अनिशमन केंद्रास प्राप्त होताच फायरमन शाम देवळेकर, दीपक देवळेकर, सहाय्यक फारयमन जयेश पवार, प्रणय रसाळ, वाहन चालक विद्याधन पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळ गाठले. भडकलेला वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. भोस्ते, अलसुरे रस्त्यालगत आंबाच्या बागांपर्यंत भडकलेला वणवा आटोक्यात आणला.