चिपळूण:-कालुस्ते नदीपात्रात 40 ते 45 वयोगटातील अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या मृतदेहाविषयी कोणतीच माहिती पुढे आलेली नसून याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तालुक्यातील कालुस्ते नदी पत्रात अनोळखी पुरुषाचा मृतदेह स्थानिकांच्या निदर्शनास आला. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर ते घटनास्थळी गेले होते. यावेळी स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह नदीबाहेर काढण्यात आला. त्यानंतर विच्छेदनासाठी हा मृतदेह कामथे रुग्णालयात आणण्यात आला. या मृतदेहाबाबत कोणतीही माहिती पुढे आलेली नसून याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या मृतदेहाबाबत काही माहिती असल्यास, पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.