चिपळूण:जमीर खलफे:-चिपळूण येथे आयोजित रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद बॉडी बिल्डिंग स्पर्धेत स्वप्निल घाटकर कै. गिरीधर मांजरेकर स्मृती बॉडी बिल्डिंग चषकाचा मानकरी ठरला. ३१ जानेवारीला या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा स्वप्निल घाटकर (पाटील जिम पावस) हा विजेता तर उपविजेता ठरला. गणेश गोसावी (पवार्स जिम, सावर्डे), रत्नागिरी कुमार सुयोग पदमुले (स्टॅलियन जिम, खेड) रत्नागिरी उदय श्री. ओंकार कोळेकर (ओंकार जिम, दापोली), रत्नागिरी श्रीमान प्रविण कांगणे (ओंकार जिम, दापोली) रत्नागिरी मेन फिजिक्स आतिश विचारे (भैरी भवानी जिम, सावर्डे) हे गटविजेते निवडण्यात आले.
कै. गिरीधर सखाराम मांजरेकर स्मृती फिरता चषक व रोख ३१०००/- रु. कै. गिरीधर यांचे मित्र कै. सदुभाऊ पाटणकर यांच्या स्मरणार्थ व रोख २१०००/- रु. श्री. मांजरेकर कुटुंबियांकडून देण्यात आले. तसेच कै. लक्ष्मण उर्फ आबा भिडे व कै. ना.द. लिमये यांचे स्मरणार्थ रोख पारितोषिक देण्यात आले. भैय्या कदम, अध्यक्ष, आदर्श क्रिडा व सामाजिक प्रबोधिनी संस्था, चिपळूण यांचेतर्फे स्पर्धकांना भोजनाची सोय करणेत आली होती. स्पर्धेमध्ये सुमारे १२५ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेसाठी चिपळूणमधील क्रिडा प्रेमी बहुसंख्येने हजर होते.
पंच म्हणून शैलेश जाधव, जितेंद्र नाचणकर, किशोर पाटील, अंकुश कांबळे, भारत बजागे, नंदू शिंदे, राज नेवरेकर, संजय रावणांग, नरेंद्र वणजू, करमरकर, मोहिते, कडवईकर व सदानंद जोशी यांनी काम पाहिले.
स्पर्धेसाठी आदर्श प्रबोधिनीचे सर्व सभासद, कार्यकर्ते यांनी मदत केली. तसेच दिवाकर आडविरकर, विरेंद्र वणजु आणि पोलिस व महावितरण व प्रशासन यांचे उत्तम सहकार्य लाभले. बक्षिस समारंभ सचिन उर्फ भय्या कदम, यांचे सहकारी यांचे हस्ते करण्यात आला.