खेड : तालुक्यातील संगलट गावचे सुपुत्र आणि लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी अब्दुल्ला हुसैन नाडकर यांची नियुक्ती राज्याचे अध्यक्ष दिनकर आमकर यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. या नियुक्ती बद्दल सरपंच अब्दुल रहेमान चौगुले, माजी उपसभापती मनसूर नाडकर, उद्योजक खलील नाडकर, शौयब चौगुले, उद्योजक करयुम नाडकर, अमानउल्ला नाडकर, पिलपले, सलीम अहमद कडवेकर, सादिक शेख आदी मित्र परिवार, हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नाडकर यांची या अगोदर लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्याच्या शासन मान्य अल्प संख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यांनी त्याच्या या कारकिर्दीत उत्कृष्ठ काम केल्याची दखल घेऊन राज्याचे दिनकर आमकर यांनी संस्थेच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती दिली आहे.