दापोली:-शहरातील उपजिल्हा रुग्णालयासमोर वाहतुकीस अडथळा होईल अशी गाडी उभी केल्याप्रकरणी लहू रामभाऊ दुर्गे (35, रा.जालगाव-पांगारवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लहू दुर्गे याने 9 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6ः20 वाजण्याच्या सुमारास दापोली ते हर्णे रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर महिंद्रा पिकआप गाडी वाहनांना अडथळा निर्माण होईल, तसेच त्यांना धोका होईल अशा स्थितीत उभी करून निघून गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.