रत्नागिरी : शहरातील आदिष्टीनगर येथे 21 वर्षीय तरुणीने गळफासाने आत्महत्या केल्याची घटना रविवार 9 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. रसिका सनगरे (21, मजगाव रोड, आदिष्टी नगर, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, रसिका ही रविवारी घरी असताना रात्री अज्ञात कारणाने मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेतला. नातेवाईकानी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. याबाबतचा रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.