रत्नागिरी: शहरातील माळनाका येथील एका हॉटेलच्या बाहेर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सॅक असा एकूण 11 हजारांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची ही घटना शनिवार 8 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा.सुमारास घडली.
याबाबत डॉ.संदिप मोतीराम तावडे (31,रा.सौंदळ देवगड,सिंधुदुर्ग) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी रात्री त्यांनी आपली बलेनो कार (एमएच-07-एजी-9951) माळनाका येथील हॉटेल विहार डिलक्स समोरील रस्त्यावर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने त्या कारची मागील काच फोडून रोख रक्कम 10 हजार आणि ब्ल्यू टूथ स्पिकर असा एकूण 11 हजारांचा मुद्देमाल चोरुन नेला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.