संगमेश्वर:-देवरूखमध्ये सलग पाचव्या वर्षी झालेल्या बाळासाहेब पित्रे स्मृती जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद आणि मानांकन स्पर्धेत यजमान देवरूखच्या आर्या यशवंतरावने मुलींच्या १५ वर्षे वयोगटातील विजेतेपद तर १७ वर्षे वयोगटातील उपविजेतेपद मिळवत जिल्ह्याच्या बॅडमिंटन क्रीडाविश्वात देवरूखचे नाव कोरले.
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका संस्थेने रत्नागिरी डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आमदार चषक स्पर्धेचे आयोजन केले होते. चिपळूणचे आमदार शेखर सर निकम यांचे सुपुत्र अनिरुद्ध निकम यांच्या हस्ते, संस्थेचे अध्यक्ष मंगेश प्रभुदेसाई, उपाध्यक्ष दिलीप विंचू, सचिव रविकांत कदम, सहसचिव नीलेश भुरवणे, खजिनदार राजू जागुष्टे, स्पर्धा प्रमुख मोहन हजारे, सदस्य हरेश पटेल, अभिषेक अग्रवाल, स्पर्धा समिती सदस्य अवधूत मेस्त्री, रूपा नलावडे सौ. वर्षा जोशी, रूपेश भागवत, अनंत वाटवे, डॉ. प्रमोद भालेकर, मंदार भाटकर, माळीसाहेब, सोहम प्रभुदेसाई, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे स्पर्धा समिती सदस्य अमित मुळ्ये इत्यादींच्या उपस्थितीत स्पर्धा पार पडली. दोन दिवसांच्या या स्पर्धेत दापोली, चिपळूण, संगमेश्वर, देवरूख आणि रत्नागिरीमधील विविध वयोगटांतील ११५ स्पर्धकांनी भाग घेतला. ११ वर्षे ते ५० वर्षे अशा विविध १८ गटांत झालेल्या सामन्यांमध्ये अनेक नामवंत खेळाडूंच्या रोमहर्षक लढती पाहण्याचा आनंद उपस्थित प्रेक्षकांनी आणि देवरुखमधील उदयोन्मुख खेळाडूंनी घेतला.
स्पर्धेतील विजयी आणि उपाविजयी खेळाडू असे – एकेरी : पुरुष खुला गट – यश भोंगले, मयूर कांबळे. महिला खुला गट – नेहा मुळ्ये, सानिका सुतार. ५० वर्षे गट – नरेश पेढाम्बकर, निनाद लुब्री. ४० वर्षे गट – निशिकांत मेहेंदळे, नरेश पेढाम्बकर. १९ वर्षे गट – मुले – यश भोंगले, आर्यन वेल्हाळ. मुली नेहा मुळ्ये, ऋचा सूर्यवंशी. १७ वर्षे गट -मुले – यश भोंगले, सुमेध सुर्वे. मुली – नेहा मुळ्ये, आर्या यशवंतराव. १५ वर्षे – मुले – सुमेध सुर्वे, अंश ढेकणे. मुली – आर्या यशवंतराव, अस्मि झोपे. १३ वर्षे- मुले -आदित घाणेकर, सम्यक हवाले. मुली – वल्लरी देवस्थळी, विश्वा गमरे. ११ वर्षे – मुले -लवीन चोचे, अभिराज पवार. मुली – वल्लरी देवस्थळी, स्वरा खेडेकर.
दुहेरी – पुरुष -अमोल भोसले + मयूर कांबळे, सुधीर चैनरू +विनीत पाटील. पुरुष ४० वर्षे – निनाद लुब्री +ओंकार फडके, नीलेश भुरवणे + गणेश जोशी.
मिश्र दुहेरी – मयूर कांबळे +सानिका सुतार, हरेश पटेल + वर्षा जोशी.
पुरुष ५० वर्षे – नीलेश मलुष्टे + निनाद लुब्री, रविकांत कदम + दिलीप विंचू.
सर्व विजयी खेळाडूंना आमदार चषक आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभ बास्टचे संस्थापक ज्येष्ठ सदस्य महेश शेठ मंथरा, सौ. सरोज सावंत, जिल्हा संघटनेचे अमित मूळ्ये, रजनीश महागावकर, नीलेश मलुष्टे, ओंकार फडके, पदाधिकारी, स्पर्धा कमिटीचे पदाधिकारी यांच्या हस्ते पार पडला.
स्पर्धेदरम्यान आमदार श्री. निकम भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदारपदी निवडून आल्याबद्दल तसेच त्यांनी स्पर्धेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा मंगेश प्रभुदेसाई व मोहन हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.