बीएसएनएल टाॅवरचे काम तात्काळ सुरु करण्याचे आदेश
श्रीकृष्ण खातू /धामणी:-संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस मधील युवा कार्यकर्त्यांनी BSNL टॉवर संदर्भात विद्यमान खासदार नारायण राणे तसेच उदय सामंत साहेब उद्योग मंत्री तथा पालक मंत्री रत्नागिरी यांना काही दिवसापूर्वी टाॅवर कामाच्या दिरंगाई संदर्भात पत्र दिल होते.
दिलेल्या पत्राची त्वरीत दखल घेऊन म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील करण्यात आली. सरपंच यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून युवा कार्यकर्त्यांनी कामाची सुरुवात केली.
रखडलेले जनतेचे प्रश्न, अडचणी खरोखरच ऐकून व समजावून घेऊन श्री सामंत व श्री राणे दखल व अ़ॅक्शन तात्काळ घेऊन कामे मार्गी लावतात याची उत्तम प्रचिती येथील युवावर्गाला आली असे लोकप्रतिनिधी तमाम जनतेच्या गरजा नक्कीच सोडवतील याचा विश्वासही युवावर्गाला ठाम वाटू लागला आहे.
या कामासाठी BSNL जन संपर्क अधिकारी दिप्ती पंडीत यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील कार्यकर्त्यांना उत्तम सहकार्य केल्याने त्यांचे आभार मानले
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुभाष लांजेकर तसेच साईम खान, अफाक बोदले, परवेज नाईक ,उद्योजक इकबाल पटेल, प्रीतम भोसले, हर्ष घेवडे, वैभव चौगुले, अशाप्रकारे युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तसेच संबंधित कॉन्ट्रॅक्टरला आपण लागेल ते सहकार्य करण्याचे व दर्जेदार काम होण्यासाठी आम्ही सदैव मदत करणार असल्याचा शब्दही या कार्यकर्त्यानी दिला आहे.