शुभगंधा सभागृह लोवले येथे प्रदान
सचिन मोहिते / देवरुख: संगमेश्वर तालुक्यातील विश्वसमता कलामंच लोवलेचे राज्यस्तरीय पुरस्कार रविवारी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.यात दादासाहेब सरफरे विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक सुहास शांताराम पाब्ये यांना राज्यस्तरीय विश्वसमता कलामंच क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तालुक्यातील लोवले येथील शुभगंधा सभागृहात दि.९ रोजी रविवारी हा पुरस्कार सन्मानाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम कलामंचचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि संपादिका-संस्थापिका भावना खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, लोवले गावच्या सरपंच ऋतुजा कदम, राजेंद्र मोहिते, प्रदिप शिंदे, बावा चव्हाण प्रतिष्ठानचे श्री. चव्हाण, श्री. भोसले यांसह राज्यातील अनेक मान्यवराच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मनोज जाधव म्हणाले जे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात त्यांना आणखी काम करण्याची प्रेरणा व उर्जा मिळावी म्हणून हा पुरस्कार दिला जातो. आज पर्यंत अनेकांच्या कार्याचा दखल आम्ही घेत आलो आहोत.
सुहास पाब्ये हे एक उत्कृष्ट कबड्डीपट्टु असुन राष्ट्रीय पंच देखील आहेत. शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात काम करताना त्यांनी अनेक खेळाडु घडविले आहेत.आणि म्हणुनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल पाब्ये यांचे तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.