रेल्वे पोलिसांची कामगिरी
रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वेस्टेशन फलाट क्रमांक 1 वरुन संशयित चोरटयाला रेल्वे पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. संतोषकुमार अशोककुमार कुपगीरमठ (29, ऱा बिदर, कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून एक ऍपल कंपनीचा लॅपटॉप पोलिसांना आढळून आला. त्याच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुह्याची नोंद करण्यात आली आहे.
संतोषकुमार हा 7 फेबुवारी रोजी रात्री 11.30 च्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 1 वर संशयास्पद हालचाली करत असल्याचे रेल्वे पोलिसांना दिसून आले. यावेळी पोलिसांकडून त्याची झाडाझडती घेण्यात आली असता त्याच्याकडे 1 ऍपल कंपनीचा लॅपटॉप असल्याचे आढळून आले. या बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो समाधानकारक उत्तर देवू शकला नाह़ी. या बाबत रेल्वे पोलिसांकडून संतोषकुमार याला पुढील चौकशीसाठी रत्नागिरी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.