रत्नागिरी:–शहरातील डायमंड बारसमोरील रस्त्यावर दारुच्या नशेत दुचाकीला धडक देत धिंगाणा घालणाऱ्या टेम्पो चालकावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा. अपघाताची घटना शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास घडली होती. आकाश निवास देसाई (28, ऱा करवीर कोल्हापूर), असे संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा दारुच्या नशेत टेम्पो (एमएच 09 ईएस 8421) चालवत होता. डायमंड बार येथे त्याने रस्त्याकडेला उभी करुन ठेवलेल्या दुचाकीला धडक दिली. यानंतर दारुच्या नशेत रस्त्यावर उभे राहून हातवारे करु लागला तसेच त्याने आरडाओरडा करत धिंगाणा घालण्यास सुरुवात केली, अशी नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकाश याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 281, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110, 117, 112 व मोटार वाहन कायदा कलम 184, 185 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.