रत्नागिरी:-शहरातील माळनाका एसटी कॉलनी येथे दारुच्या नशेत पत्नीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. किशोर शांताराम पांचाळ (50, ऱा एसटी कॉलनी माळनाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
किशोर पांचाळ हा 8 फेबुवारी रोजी सायंकाळी दारु पिवून घरी आला होता. यावेळी पत्नीने त्याला दारु पिवून घरी कशाला येता, अशी विचारणा केली. याचा राग आल्याने किशोर याने लादी साफ करण्याच्या मॉबच्या काठीने पत्नीला मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार रत्नागिरी शहर पोलिसात दाखल करण्यात आली आहे.