चिपळूण:-बांधकामातील मटेरियल व सेट्रींग साहित्य अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याची घटना काही दिवसापूर्वी सावर्डे-कासारवाडी येथील पूलाच्या ठिकाणी घडली. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद गणेश भिमू चव्हाण (36, आगवे) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश चव्हाण यांनी खासगी विहिर खोदण्याचे काम घेतले होते. या विहिरीचे बांधकाम सुरु असून विहिर बांधण्यासाठी लागणारे सर्व साहित्य उघडयावर ठेवण्यात आले होते. असे असताना 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 ते 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 या कालावधीत 21 हजार किंमतीचे वेल मटेरियल व सेट्रींग साहित्य अज्ञात चोरटयाने चोरुन नेले.
हा चोरी प्रकार गणेश चव्हाण यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी अज्ञात चोरटयावर गुन्हा दाखल करण्यात आला.