लांजा:-हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांजा शहरातील हजरत सय्यद चाँदशाह बुखारी बाबा यांचा उरूस बुधवार दि.१२ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
या निमित्ताने सोमवार १० फेब्रुवारी रोजी चुना शरीफ, मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी संदल शरीफ व बुधवार १२ फेब्रुवारी रोजी रात्री रातीबचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर तौसिफ जुनेदी आणि आरजु बानु यांचा संगितमय कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. तरी भाविकांनी बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन लांजा उर्स कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.