राजापूर : तालुक्यातील पेंडखळे येथील जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ ची इमारत धोकादायक बनली असून, ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत गेली सात वर्षे संबंधित खात्यांना आणि प्रशासनाला निवेदन देऊनही दुरुस्ती न केल्याने ही इमारत अधिकच धोकादायक बनली आहे.
या धोकादायक इमारतीबाबत पेंडखळे येथील रहिवासी आणि सध्या पुणेस्थित असलेले राजाराम हरी खानविलकर यांनी आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पत्र दिले आहे. या पत्रानुसार धोकादायक बनलेल्या शाळेच्या इमारतीबाबत गावपातळीवर व शाळा कमिटीतर्फे २०१८ पासून संबंधित खात्यांना व प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच डिसेंबर २०२४ मध्ये आपले सरकार पोर्टलवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या रत्नागिरीतील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे संबंधित विषयाबाबत तक्रार दाखल केलेली आहे. त्यानंतर २१ दिवसांच्या आत कार्यवाही करून तसा. अहवाल देणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप
वर्षे जुनी असून, इमारत तिची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
त्यांच्याकडूनही कोणताच प्रतिसाद व दखल घेण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे. या शाळेला ग्रामविस्तार अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र, त्यानंतरही कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे खानविलकर यांनी म्हटले आहे.
तसेच जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामसभेतही हा विषय घेऊन तसा ठरावही सर्वांनुमते मांडण्यात आला आहे. संबंधित इमारतीच्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन पाहत आहे का, असा प्रश्न खानविलकर यांनी केला आहे.