रत्नागिरी : शहरातील मारुती आळी येथे चाळीतील एका खोलीला अचानक आग लागली. मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागल्यामुळे हा प्रकार लक्षात आला. स्थानिक रहिवाशांनी तातडीने पालिकेच्या अग्निशमन दलाला संपर्क साधला. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन २० मिनिटांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मारुती आळी येथे चाळीमधील श्री. बारटक्के यांच्या खोलीला आग लागली. आज दुपारी ही घटना घडली. खोलीमधून धूर येऊ लागल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून तत्काळ अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाचे फायरमन नरेश मोहिते, रोहण घोसाळे, शिवम शिवलकर आणि वाहनचालक संकेत पिलणकर तत्काळ घटनास्थळी दाखल क झाले. या दलाने त्वरित मदतकार्य करत आग आटोक्यात आणली… त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वित्तहानी टळली.