संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिला दौरा
रत्नागिरी- राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे हे शनिवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. भाजपचे त्यांची रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती जबाबदारी घेतल्यानंतर हा पहिला दौरा होता, त्यामुळे सायंकाळी झालेल्या भाजपा संघटनात्मक बैठकित राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
मंत्री नितेश राणे हे शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका येथे भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळाव व सत्कार समारंभाला उपस्थित होते. त्यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, केदार साठे, सतेज नलावडे, अशोक मयेकर, बाबा परुळेकर, सचिन वहाळकर, रवींद्र नागरेकर, विवेक सुर्वे, दादा दळी आधी पदाधिकारी उपस्थित होते.
पक्ष बळकटीसाठी भाजपने जिथे भाजपचा मंत्री किंवा आमदार नाही तिथे भाजपच्या मंत्र्यांवर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामध्ये नितेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.