संगमेश्वर, लांजा, देवरूख येथील महिलांचा सहभाग
मानसकोंड येथील महिलेच्या कहाणीने सारेच गहिवरले
वैदेही सावंत / देवरूख:- चक्रभेदी सोशल फाउंडेशन देवरुख तर्फे आनंदाचा क्षण व शासकीय योजनांचा जागर हा नावीन्यपूर्ण उपक्रम पंचायत समिती देवरुख सभागृह त्याचबरोबर साने गुरुजी विद्यालय, पुणे बॅ. नाथ पै सभागृह येथे याच स्वरूपाचा कार्यक्रम यशस्वीरित्या नुकताच पार पडला. सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना हळदीकुंकू, वाण व साडी वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मातृमंदिर संस्थापक इंदिराबाई हळबे मावशी यांच्या फोटोला हार घालून करण्यात आले. नंतर उपस्थितानी प्रार्थना म्हटली. वैदेही किर्वे यांनी प्रस्तावना केली.विधवा अनिष्ठ प्रथेला मूठमाती देऊन विधवा सवाष्ण असा भेदभाव नष्ट होऊन समाजात तिला मानसन्मान मिळावा तसेच शासकीय योजनांची माहिती मिळावी यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विधवा अनिष्ठ प्रथेला मूठमाती देऊन सर्व अलंकार परिधान करून आलेल्या लांजाच्या समीक्षा जाधव यांना देण्यात आले.
लांजाच्या तिल्लोतमा खानविलकर यांनी आपल्या मनोगतात समाजाची मानसिकता हळूहळू बदलेल. सकारात्मक परिवर्तन नक्की होईल असे मत व्यक्त केले.महाराष्ट्र नंदीवाले समाज संघटनेचे राज्य सचिव रावसाहेब चौगुले यांनी स्त्री विधवा होणं यात तिचा काय दोष?तिचा काही दोष नसताना तिच्या बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे, जोडवी काढणे हे योग्य आहे का?असे विचार प्रवर्तक प्रश्न विचारून उपस्थित महिलांना विचार करायला लावले.
आपल्या गावात विधावासाठी विविध उपक्रम घेतल्याबद्दल ताम्हाणे गावचे सरपंच अमर सावंत तसेच लांजाचे रवींद्र कोटकर, मुकुंद करंबळे, मनोहर करंबळे,केशव वासुदेव गवाणे यांचा सत्कार करण्यात आला. त्तदप्रसंगी रविंद्र कोटकर आपल्या मनोगतात आमच्या गावात कार्यक्रम घेताना आम्हाला सुद्धा खूप अडचणी आल्या परंतु काही महिलांनी, लोकांनी साथ केली म्हणून आम्ही यशस्वीरित्या कार्यक्रम करू शकलो असे ते म्हणाले.
मानसकोंड फेफडेवाडीतून आलेल्या अंजली फेफडे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना साडी, हळदीकुंकू तिळगुळ गुलाबाचे फुल, वाण देऊन सुवासिनी प्रमाणे मानसन्मान करण्यात आला. त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या आयुष्यातील सार्वजनिक पूजेचा नैवेद्य करतानाचा अपमानित क्षण सांगितला व संपूर्ण सभागृहाला प्रश्न विचारला “माझ्या हाताला काय झाले आहे? माझा नवरा वारला यात माझा काय दोष? आणि मी नैवेद्य केला तर तो देवाला चालणार नाही का? आणि सगळ्यांना विचार करायला लावले त्यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पण आज आम्हाला चक्रभेदी संस्थेने जो आत्मसन्मान दिला त्याबद्दल आभार मानले संस्थेच्या कार्याविषयी आनंद व समाधान व्यक्त केले.
म. इ.बा.का. कल्याणकारी मंडळचे व्यवस्थापक शैलेश पवार यांनी विविध शासकीय योजनांचे माहिती दिली व चक्रभेदी संस्थेला इथून पुढे पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.सामाजिक कार्यकर्ते युयूत्सु आर्ते यांनी महिलांवरील अन्यायाविरुद्ध आम्ही नक्कीच आवाज उठवू तसेच समाजात विधवा महिलांना मानसन्मान मिळावा यासाठी चक्रभेदी करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
संस्थेच्या वैदही सावंत यांनी आपल्या मनोगतात विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी 6/2/ 2022 रोजी विधवा महिलांना आमंत्रित करून आपण या उपक्रमाला सुरुवात केली त्याला ३ वर्षे झाली हे चौथ वर्ष आहे असे सांगून उपस्थिताना इथून जाताना केवळ साडी,वाण घेऊन जाऊ नका तर अनिष्ठ प्रथा बंद करण्याचा विचार घेऊन जा असे सांगितले. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्ये त्यांनी सांगितले की या कार्यक्रमाला केवळ विधवा व एकल महिलाच नाही तर सवाष्ण आणि पुरुषही उपस्थित असल्यामुळे स्त्री पुरुष, सवाष्ण,विधवा हे सगळे भेदभाव या कार्यक्रमात सम्पले याविषयीचा आनंद त्यांनी व्यक्त केला.सदर कार्यक्रमासाठी कुठूनही निधी नसल्याने काही महिलांनी कॉन्ट्रीब्युशन करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. स्नेहालय संस्थेचे गिरीष कुलकर्णी सरांनी संस्थेला साड्या डोनेट केल्या सर्वांनी सरांचे खूप खूप आभार मानले. मुकुंद करंबळे यांनी विधवांवर स्वतः लिहिलेले गीत गायन केले त्यामुळे सभागृहात एक वेगळेच वातावरण तयार झाले अनेक जणींचे डोळे पाणावले.
संस्थेच्या वैदेही सावंत यांच्या हस्ते लोककल्याणकारी योजनाचा जागर यां पथनाट्यात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल अंकुश शिवगण,आकांक्षा शिवगण यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कविता काजरेकर ताईंनी आपण सर्व महिलांनी एकत्रित येऊन आनंद लुटला पाहिजे असे सांगितले. पंचायत समिती सभागृह दिल्याबद्दल बी. डी. ओ. भरत चौगुले यांचे आभार मानले.त्यानंतर सगळ्यांनी मिळून विधवानिष्ठ प्रथा बंद करण्याची शपथ घेतली. नंतर काजरेकर ताईंनी
आवाज कुणाचा यावर सगळ्यांनी मिळून चक्रभेदीचा आशा घोषणा दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मिता पाटील,प्रतिभा चव्हाण, अमृता तांडेल, साक्षी कदम,प्रियांका यादव,सचिन मांगल्ये, विलास रहाटे,आरती बने यांनी कठोर परिश्रम घेतले. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.