रमेश मोरे यांचे पार्थिव रत्नागिरी मेडिकल कॉलेजकडे
नाणीज : जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून शिष्यपरिवारातील कै. रमेश काशीराम मोरे , वय ८१, रा. किल्ला (रत्नागिरी) यांचे ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान, नेत्रदान करण्यात आले. जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेतून झालेले हे ८१ वे देहदान आहे.
कै. मोरे गुरुजी,यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मोरे यांचे पुत्र राजेश रमेश मोरे व त्यांच्या मुली सौ. अंजनी अरविंद साळवी आणि सौ रागिनी राजेंद्र तळेकर यांनी आपल्या वडिलांच्या ईच्छेप्रमाणे त्यांचे रत्नागिरी वैद्यकीय मेडिकल कॉलेज येथे देहदान केले. तसेच लायन्स क्लब हॉस्पिटल रत्नागिरी येथे नेत्रदान केले.
यावेळी मुलगा – राजेश रमेश मोरे, सून – रत्नाली राजेश मोरे, मुलगी – अंजनी अरविंद साळवी, जावई – अरविंद रामचंद्र साळवी, मुलगी – रागिनी राजेंद्र तळेकर, जावई – राजेंद्र मनोहर तळेकर, मेहूणे – सुभाष कृष्णा कळंबटे आदी नातेवाईक उपस्थित होते.
देहदानप्रसंगी रुग्णालयात स्व- स्वरूप संप्रदायाचे पदाधिकारी संदिप नार्वेकर, बाळकृष्ण चव्हाण, परशुराम जाधव,श्री महेन्द्र भरणे आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्त्या,श्रद्धा कळंबटे, भैय्या वळंजु,हॉस्पिटल मधील शरिरशास्त्र विभागाचे डॉ.सादिक अली सय्यद, डॉ. मंजुषा यादव, डॉ. योगिता कांबळे व अन्य सहकाऱ्यांनी पार्थिव स्वीकारले. लायन्स क्लब हॉस्पिटलमधील किशोर सूर्यवंशी यांनी नेत्र स्वीकारले.
जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेने कै रमेश काशीराम मोरे यांनी मरणोत्तर देहदानासाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानकडे अर्ज सादर केला होता. मोरे कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेनुसार आपल्या वडिलांचे मरणोत्तर देहदान, नेत्रदान करून समाजापुढे सेवेचा आदर्श ठेवला आहे.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रेरणेने व संस्थानाच्या मरणोत्तर देहदान उपक्रमांतर्गत हे ८१ वे देहदान झालेआहे. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने समाजामध्ये मरणोत्तर देहदान तसेच अवयव दानाबाबत एक वैचारिक जागृती घडवून आणली. मृत्यूनंतरही लोकांच्या उपयोगी पडा या त्यांच्या आवाहनने प्रेरित होऊन ६५ हजारांवर भक्तांनी संस्थांकडे देहदानाचे फॉर्म भरून दिले आहेत.