चिपळूण / दिपक कारकर:-गुहागर – चिपळूण तालुक्याच्या मध्यस्थी व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या केरे गावचं ग्रामदैवत असणाऱ्या पुरातन मंदिराचे नूतनीकरण काम पूर्ण झाले असून मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीसंस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.शनिवार दि.१५ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे.शनि. १५ रोजी नवीन मूर्ती वाजत – गाजत मिरवणूकसह मंदिरात आणणे,रविवार १६ रोजी होम हवन याग व रात्रौ १० वा.केरे ग्रामस्थ यांचे नमन तर सोमवार दि.१७ रोजी नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा व धार्मिक कार्यक्रम, श्री सत्यनारायण महापूजा व रात्रौ ९. ०० वा.रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय असणारे हौशी कलाकार नमन मंडळ ( गोळवली – संगमेश्वर ) यांचे नमन सादर होणार आहे.सदर सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन समस्त केरे गाव ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ/ महिला मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.