खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील लवेलनजीक झालेल्या अपघातात वृद्ध कामगाराच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पंडित नामक चालकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठ्ठल रामचंद्र खळे (75, लवेल-खळेवाडी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. ते लवेल येथील एच. पी. पेट्रोलपंपासमोरील बाजूस साफसफाईचे काम करत असताना डिझेल भरण्यासाठी पेट्रोलपंपावर आलेल्या मिक्सर वाहनाने (एम.एच.12/एस.एक्स. 6778) धडक देत गंभीर दुखापत केली. या बाबत महेश कृष्णा खोडदेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.