देवरुख : देवरूख शहरात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. येथील एका वसतिगृहातील 3 विद्यार्थिनींनी विषारी द्रव प्राशन केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराने संस्था चालकांनी घाबरगुंडी उडाली आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी घडली. या तीनही विद्यार्थीनीना त्रास जाणवू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले.
गुरूवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तीन विद्यार्थीनींनी फिनेल प्राशन केल्याचे समजते. अचानक त्यांना उलट्या होवू लागल्याने त्यांना देवरूख रूग्णालयात दाखल करण्यात आले. या दरम्यान त्यांनी फिनेल प्राशन केल्याची बाब पुढे आली. त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फिनेल प्राशन करण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात असून पोलीस तपासाअंती ते स्पष्ट होणार आहे.