दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची अंमली पदार्थ विरोधी कारवाई
रत्नागिरी : जिल्हयामध्ये घरफोड्या व चोऱ्या यांना प्रतिबंध करण्याचे अनुषंगाने तसेच अवैध व्यवसाय यांचेवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलींग करणेबाबत मा. पोलीस अधीक्षक, श्री.धनंजय कुलकर्णी, मा.अपर पोलीस अधीक्षक. श्रीमती जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक, श्री. नितीन ढेरे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार करुन त्यामार्फत महत्वाच्या ठिकाणी पेट्रोलींग सुरु होती. त्यानुसार 6 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शहर परिसरात पेट्रोलींग करीत असताना तीन संशयीत हालचालीवरुन एकता नगर रत्नागिरी परिसरामधून आरोपी रऊफ इक्बाल डोंगरकर, ( 35 वर्षे, रा. उर्दू स्कूलजवळ, कर्ला, रत्नागिरी, नझीर अहमद मोहम्मद वस्ता, ( 38 वर्षे, रा. वस्ता मोहल्ला, राजीवडा, रत्नागिरी), राहील अजीज सुवर्णदुर्गकर ( 29 वर्षे, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 405 ब्राउन हेरोईन या अंमली पदार्थाच्या पुडया व इतर साहीत्य असा एकूण 1,45,750/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदर आरोपीत यांचेवर एन.डी.पी.एस. अॅक्स कलम 8 (क), 21 (ब), 29 अन्वये रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील खालील नमुद पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी केलेली आहे.
पोलीस निरीक्षक, श्री. नितीन ढेरे, सहा. पोलीस निरीक्षक, श्री. प्रमोद वाघ,पो.हे.कॉ (251 शांताराम झोरे,
पो.हे.कॅ / 909 विजय आंबेकर,पो.हे.कॉ/ 1407 दिवराज पाटील, पो.हे.कॉ/ 262 विवेक रसाळ