पाचल:– राजापूर तालुक्यातील पाचल गावातील तरुण पिढी पुढे येत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर महाराजांना मानवंदना देण्याच्या उद्देशाने पाचल मधील प्रामुख्याने वर्दळ असलेल्या विठापेठ मलकापूर अनुस्कुरा साटवली पावस रस्ता राज्य मार्ग 150 या मार्गावरील पाचल येथे असलेल्या जवळेथर फाटा या ठिकाणाला “छत्रपती शिवाजी महाराज चौक” असं नामांतर करावे या संदर्भातील निवेदन तथा अर्ज गुरवार दिनांक 06 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत पाचलचे प्रथम नागरिक व सरपंच श्री. बाबालाल फारस सर यांना देण्यात आला.
या वेळी गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये मंगेश(बंधु ) कुडतरकर,विनायक सक्रे,सोहन सुतार,अनिकेत सक्रे , विपुल वायकुळ,अमित राणे,मनोज सार्दळ आदी उपस्थित होते. या प्रस्तावाला ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वाक्षरी करून पाठिंबा दर्शविला आहे ही बाब समोर मांडण्यात आली. तरी सदर अर्ज तात्काळ ग्रामसभे मध्ये घेऊन ठराव मंजूर करण्यात यावा ही विनंती या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. तरी दिलेल्या निवेदन वजा अर्जाच्या मागणी विचारात घेऊ असे आश्वासन पाचल गावचे सरपंच श्री बाबालाल फरास सर यांनी दिले आहे.
या अर्जामध्ये मध्ये पाचल गावातील विविध ठिकाणांचे ही नामांतर करण्यात यावे या संदर्भातील प्रस्ताव या निवेदना मार्फत ठेवण्यात आला आहे,त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग , स्वामि विवेकानंद चौक , स्वातंत्रवीर सेनानी चौक , हनुमान पथ,व श्री केदरलिंग मार्ग आणि महागणपती मार्ग या सर्व मार्गांचा समावेश या निवेदना मध्ये करण्यात आला आहे.