न्यायालयाच्या आवारात घडली होती घटना
संगमेश्वर:-शुल्लक कारणावरून पतीने पत्नीला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना देवरूख न्यायालय परिसरात घडली होती. या प्रकरणा निकाल लागला असून न्यायाधीशांनी पतीला 3 हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मंगेश शंकर बारगुडे यांनी 18 डिसेंबर 2017 रोजी पत्नी साक्षी बारगुडे यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. साक्षी बारगुडे यांनी दिलेल्या फीर्यादीनुसार मंगेश बारगुडे याच्यावर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. या निकाल लागला असून न्यायाधीश बी. डी. तारे यांनी मंगेश बारगुडे याला 3 हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी सरकारी वकील म्हणून सुप्रिया वनकर, ए. एल. दड्डेकर, प्रभारी अधिकरी म्हणून पोलीस निरीक्षक अतुल जाधव, तपासीक म्हणून पोलीस निरीक्षक संग्राम पाटील, कोर्ट पैरवी म्हणून एम. आर. बोंद्रे यांनी काम पाहिले.