प्रांताधिकारी यांनी दिलेले आश्वासन हवेत विरले
रत्नागिरी : २६ जानेवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजापूर तालुक्यातील साखरी नाटे जेटीचे धाऊलवल्ली खाडीमधील कामाच्या प्रक्रिये विरोधात आंदोलन केले होते. त्या वेळी प्रांताधिकारी यांनी चर्चेचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात जेटी कामकाज धुमधडाक्यात सुरू झाले. या विरोधात जलसमाधी आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.
२६ जानेवारीच्या आंदोलनात प्रांतां कडून जिल्हाधिकारी यांचे सोबत बैठक लावून मनसेने उपस्थित केलेल्या प्रश्नावर मार्ग काढू या असे आश्वासन दिले होते. त्या पासून घुमाजाव करून पुन्हा जेटीच्या कामास परवानगी दिली गेली आहे. याच्या निषेधार्थ मनसे राजापूर उपतालुका अध्यक्ष जयेंद्र कोठारकर रविवारी जलसमाधी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यांना शुक्रवारी पत्र दिले.
साखरी नाटे जेटीचे धाऊलवल्ली खाडीमधील कामाच्या प्रक्रिये विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २६ जानेवारी रोजी प्रजासात्ताक दिनी खाडीच्या पाण्यात उतरून आंदोलन केले. सुमारे 25 ते 30 कार्यकर्तेनी खोल पाण्यात उतरून मेरिटाइम बोर्ड व कॅप्टन भुजबळ यांचे विरोधात घोषणा दिल्या. तब्बल 2.5 तासा नंतर नंतर स्थानिक प्रशासनाने दाखल घेऊन राजापूर चे प्रात डॉ जास्मिन व तहसीलदार यांनी आंदोलकांची भेट घेतली व भावना जाणून घेतल्या.
प्रांतानी आधी पाण्या बाहेर या आपण चर्चेने मार्ग काढू अशी विनंती करताच आंदोलक पाण्यातून बाहेर आले. चर्चे दरम्यान मेरिटाइम बोर्डाच्या गलथान कारभाराचा पाढाच मनसेच्या पदाधिकारी यांनी वाचला. आणी दोन मागण्या प्रांत मॅडम समोर ठेवल्या. एक म्हणजे मुजोर कॅप्टन भुजबळ यांची बदली आणी सदर जेटीच्या बांधकामाला स्थगिती द्या. त्यावर प्रांत नी तात्काळ कामं थांबवण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले व भुजबळ संबंधित आपली मागणी जिल्हाधिकारी यांचे पर्यंत पोहोचवतो असे सांगितले होते. आता जेटीचे काम धुमधडाक्यात सुरू झाल्याने मनसेने जलसमाधी आंदोलनाची घोषणा केली आहे.