महाड:- मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील महाड हद्दीतील वहूरनजीक वेगवान कारचे एक्सेल तुटून कार उलटली. या भीषण अपघातात सहा जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी महाड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी अन्यत्र हलवण्यात आले आहे.
(एम.एच.06/बी.यु. 1070 ) क्रमांकाया कारमधून सहा जण प्रवास करत होते. कार महाड हद्दीतील वहूरनजीक आली असता अचानक कारचे एक्सेल तुटल्याने काही क्षणातच उलटली. सहा प्रवासी कारमध्येच अडकले. या भीषण अपघातानंतर महाड पोलीस व मदतकर्ते तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेतले. कारमध्ये अडकलेल्या सर्व जखमींना अथक प्रयत्नानंतर बाहेर काढून उपचारासाठी महाड शासकीय रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर वाहतूकही काहीकाळ ठप्प होऊन दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हा अपघात इतका भीषण होता की, काराया छतावरील भागा चेंदामेंदा होवून आतील साहित्य सर्वत्र विखुरले होते. अपघातानंतर रस्त्याच्या मध्यभागा अडकलेली अपघातग्रस्त कार क्रेंनच्या सहाय्याने बाजुला हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. जखमींची नावे मात्र समजू शकली नाहीत.