कोकणवासीयांसाठी 8 तारखेला दिवा नगरीत मनोरंजनाची पर्वणी
संगमेश्वर:-कोकणात पूर्वापार चालत आलेली एक लोकप्रिय अशी लोककला म्हणजे नमन. आज कोकणी माणूस कामानिमित्त नोकरीधंद्यासाठी मुंबईत स्थिरावलेला आपल्याला बघायला मिळतो, आणि या लोकांच्या मनोरंजनासाठी कोकण रहिवाशी संघटना दिवा ( रजि ठाणे ) यांच्या वतीने शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री गोसावीकृपा नमन कला मंच मुंबई ( संगमेश्वर, सोनगिरी )यांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, या मध्ये आकर्षक गणदर्शना, स्त्री पात्रांनी नटलेली ठसकेबाज गौळण, आणि सध्याच्या ज्वलंत परिस्थिती वर आधारित वागनाट्य सोन्यासारखा सोडुनी संसार, कशाला हवा नवरा मुंबईकर असा एक नवीन कलाकृती सादर करण्यात येणार आहे, या कार्यक्रमाचे निर्माता आणि लेखक शाहीर राजेंद्र कृष्णा टाकळे, दिग्दर्शक प्रवीण तानाजी कुळ्ये, पार्श्वगायक शाहीर रविंद्र भेरे, पार्श्वगायिका पूनम कोंडगेकर, संगीतकार महेंद्र फटकरे, स्वप्नील गुरव, परशुराम गावडे, सूरज वेले, अजय धनावडे काम करणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी मुंबई स्थित बहुसंख्य लोकांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती आयोजक मंडळ आणि नमन मंडळाच्या वतीने करण्यात आलेली आहे.