खेड : तालुक्यातील आंबवली – बिजघर फाट्यानजीक बुधवारी सायंकाळच्या सुमारास एका डंपरने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षा चालक गंभीररित्या जखमी झाला. अपघातात रिक्षाचेही नुकसान झाले आहे.
जखमी रिक्षाचालकास तातडीने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिक्षाचालक हा आपल्या ताब्यातील (एमएच 08 बी.सी. 0034) क्रमांकाची रिक्षा घेऊन वरवली- चाटव खेडकडे येणाऱ्या डंपरने धडक दिली. जखमी रिक्ष चालकाचे नाव समजू शकले नाही. रिक्षामध्ये कोणीही प्रवासी नव्हते. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. रात्री उशिरापर्यंत अपघाताचा अधिक तपशील उपलब्ध झाला नाही.